कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

WHO

जिनेव्हा : कोरोनाची साथ रोखण्यासाठी लावण्यात आलेला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय अनेक देश घेत आहेत. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाचा इशारा दिला आहे. लॉकडाऊन हटवण्यात घाई केली तर कोरोनाची दुसरी सर्वोच्च लाट येण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे आपत्कालीन संचालक डॉक्टर माइक रायन म्हणाले की, “काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होते असली तरी मध्य आणि दक्षिण अमेरिका, दक्षिण आशिया आणि आफ्रिका येथे ही संख्या वाढते आहे. सध्या जग कोरोनाच्या पहिल्या लाटेत असून कोणत्याही क्षणी कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने सरकारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.”

हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात ५० लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे त्यांना इशारा देताना माइक रायन यांनी कोरोना टप्प्याटप्प्याने येत असल्याचा इशारा दिला आहे. माइक रायन यांनी युरोप आणि नॉर्थ अमेरिका अशा देशात निर्बंध शिथील करण्यात आले आहेत आणि सर्वसामान्य जीवन सुरळीत होत आहे. त्यांनाही लोकांच्या सुरक्षेसाठी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. ही दक्षता घेतली तरच कोरोनाची दुसरी लाट टाळता येईल, असे ते म्हणाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER