आरोग्यमंत्र्यांनी महिनाभरातच घेतली कोरोनाची दुसरी लस ; सोशल टीकेचा भडिमार, अखेर टोपेंनी दिले स्पष्टीकरण

Maharashtra Today

मुंबई :- राज्यात एकीकडे कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. पुरेशा लशी उपलब्ध नसल्याची कारणे दिली जात आहे. मात्र दोन लसीकरणाच्या मात्रा घेण्यासाठीचा कालावधी वाढविला गेला आहे. या कारणावरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर सोशल मीडियावरून (Social Media) टीकेचा भडीमार होत आहे.

राजेश टोपे यांनी आज लस घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर यावरून टोपे विरोधात नाराजी सुरू झाली आहे. एक महिन्याचा कालावधी पू्र्ण होताच दुसरी लस कशी घेतली? म्हणून प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार लस घेण्यासाठीचा कालावधी नव्या बदलानुसार साधारण तीन महिने करण्यात आला आहे. परंतू त्याआधीच आरोग्यमंत्री लस कसे घेतात, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. या प्रकरणी राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे .

आरोग्यमंत्री यांनी कोव्हीशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली, अशी माहिती टोपे यांच्या कार्यालयातून आली आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button