ट्रम्प यांना परभवानंतर दुसरा धक्का; मेलेनिया देणार घटस्फोट

Donald Trump & Melena Trump

वॉशिंग्टन : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना  दुसरा मोठा धक्का बसणार आहे. पत्नी मेलेनिया (Melania) त्यांना घटस्फोट (Divorce) देणार आहेत. डेल मेल या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. मेलेनिया ट्रम्प यांच्या एका पूर्व सहयोगी स्टेफनी वोल्कॉफनच्या हवाल्याने डेल मेलनं हे वृत्त दिलं आहे. त्यात म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांच्यात १५ वर्षांपूर्वी सुरू झालेलं नात संपुष्टात येत आहे.

दोघांच्या नात्याला तडा गेला आहे. व्हाइट हाउसमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वास्तव्यास आहेत. मेलेनिया ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये घटस्फोट आणि लग्नासंदर्भात सध्या चर्चा सुरू आहेत. मेलेनियाने मुलगा बॅरेनचा ताबा आणि संपत्तीत अर्धा वाटा मागितला आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडताच दोघांमध्ये घटस्फोट होऊ शकतो.

मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्पच्या लग्नाला स्टेफनी वोल्कॉफनने ट्रंजेक्शनल म्हटले आहे.याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांचा राजकीय सहयोगी ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन यांनीही ट्रम्प-मेलेनिया यांच्या नात्यात तडा गेल्याचं म्हटलं आहे. ओमारोसा मॅनिगॉल्ट न्यूमॅन म्हणाले – १५ वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ट्रम्प दाम्पत्याचे नाते संपुष्टात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउसमधून बाहेर पडताच मेलेनिया घटस्फोट देईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा बदला घेण्यासाठी मेलेनिया ट्रम्प सध्या रस्ता शोधत आहे.

दोघांची अशी झाली होती भेट

१९९८ मध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रेमप्रकरण सुरू  झाले होते. त्यावेळी ट्रम्प यांचं वय ५२ होतं  तर मेलेनिया यांचे  २८. न्यूयॉर्कमध्ये फॅशन वीक सुरू होता.  त्यानंतर टाइम्स स्क्वेअरच्या किटकॅट क्लबमध्ये पार्टी झाली. पार्टीमध्ये मेलेनिया आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. २००४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी १.५ मिलिअन डॉलरची डायमंड रिंग मेलेनियाला देत लग्नाची मागणी केली होती. २२ जानेवारी २००५ रोजी  दोघांनी लग्न केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER