राजू शेट्टी आणि पोलिसांच्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झटापट

Raju Shetty

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या आंदोलनावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांच्यात झटापट झाली. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पंतप्रधान मोदींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी आंदोलन शांततेत सुरू होते दरम्यान काही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींचा प्रतिकात्मक पुतळा वाहनातुन आणत जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांच्यात जोरदार झटापट झाली. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

यावेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले दोन दिवसांत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा काढा अन्यथा देश पेटुन उठेल. या सरकार कृषी कायदा करून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. आम्ही गेली सहा महिने केंद्रसरकारसोबत पत्रव्यवहार करतो आहे परतु कोणतीही दखल या सरकारने घेतली नाही. शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही रस्त्यावरून जाताना पोलिसांकरवी बेछुट पाण्याचा मारा करण्यात आला. याचबरोबर दिल्लीकडे जाणारा शेतकरी फक्त पंजाब आणि हरियाणाचा नाही तर संपुर्ण भारताचा आहे. असे राजू शेट्टी यांनी आंदोलना दरम्यान सांगीतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER