मिस इंडिया स्पर्धेत एका प्रश्नाने सुष्मिता सेनचे बदलले भविष्य

Sushmita Sen

सुष्मिता सेन आपला वाढदिवस १९ नोव्हेंबरला साजरा करते. १९९४ मध्ये सुष्मिताने फेमिना मिस इंडिया किताब जिंकला. त्याच वर्षी सुष्मिताची मिस युनिव्हर्स म्हणून निवड झाली. त्यावेळी ती फक्त १८ वर्षांची होती. सुष्मिताला मिस युनिव्हर्सचे विजेतेपद मिळवण्यासाठी खूपच कठीण प्रवास करावा लागला.

सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय दोघींनीही मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला. ही स्पर्धा गोव्यात आयोजित करण्यात आली होती. दोघेही मिस इंडिया जिंकण्याच्या प्रबळ दावेदार होत्या. इतकेच नव्हे तर सुष्मिताला असे वाटले की, ऐश्वर्या खूपच सुंदर असल्यामुळे ती  हावी होत आहे.

मिस इंडिया स्पर्धेच्या शेवटच्या फेरीत सुष्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात टाय झाला होता. त्यावेळी सर्वांचे हृदयाचे ठोके वाढले होते. कुणाच्या डोक्यावर मिस इंडियाचा मुकुट असेल? न्यायाधीशांनी दोघींना ९.३३ गुण  दिले. यानंतर  प्रत्येकीला  एक प्रश्न विचारला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. जिचे उत्तर चांगले असेल ती मिस इंडिया होईल.

यानंतर न्यायाधीशांनी ऐश्वर्या राय हिला प्रश्न विचारला- ‘आपल्या पतीमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल? रिज फॉरेस्टरसारखे किंवा मॅसन कॅपवेलसारखे धाडशी आणि सुंदर. रिज  फॉरेस्टर आणि  मॅसन  कॅपवेल दोघेही हॉलिवूड मालिकांत भूमिका  करताहेत. त्याला  ऐश्वर्याने उत्तर दिले, ‘ मॅसन. आमच्या दोघांमध्ये बर्‍याच गोष्टीत साम्य आहेत.  मॅसन   खूप काळजी घेणारा आहे आणि तो चांगला विनोदी आहे. ते माझ्याशी जुळते.

‘आता सुष्मिता सेनला प्रश्न विचारण्याची पाळी होती. सुष्मिताला विचारले, ‘आपल्या देशाच्या वस्त्रोद्योगाविषयी तुला काय माहिती आहे? याची सुरुवात कधी झाली? आणि तुला काय घालायला आवडेल?’  हा प्रश्न असा होता की, सुष्मिता ऐश्वर्यावर भारी होती. ती म्हणाली, ‘मला वाटते की याची सुरुवात महात्मा गांधींच्या काळापासून झाली. याला बराच काळ झाला आहे. मला भारतीय आणि पारंपरिक कपडे घालण्याची आवड आहे. मला माझ्या वॉर्डरोबमध्ये भारतीय कपडे ठेवायचे आहेत.’

ही बातमी पण वाचा : प्रभासला प्रभू राम आणि सैफला रावणाच्या अवतारात पाहण्याची प्रतीक्षा संपली, या दिवशी प्रदर्शित होणार आदिपुरुष

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER