उ. प्र. ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी थांबविण्यास नकार

Supreme Court - Election - Maharashtra Today
Supreme Court - Election - Maharashtra Today

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये उद्या रविवारी होणाºया ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीच्या वेळी सर्व कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी हमी राज्य निवडणूक आयोगाने दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ही मतमोजणी थांबविण्यास नकार दिला.

कोरोना महामारीची साथ पुन्हा जोमाने पसरत असल्याने या निवडणुका सध्या घेऊ नयेत, अशी एक व मतमोजणी पुढे ढकलावी अशी दुसरी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळल्या होत्या. त्याविरुद्ध करण्यात आलेल्या विशेष अनुमती याचिकांवर (SLP) न्या. अजय खानविलकर व न्या. हृषिकेश रॉय यांच्या खंडपीठाने सुट्टी असूनही विशेष सुनावणी घेतली. मतमोजणीमुळे कोरोनाच्या प्रसारात भर पडू नये यासाठी सर्व काळजी घेतली जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने दिलेले आश्वासन नोंदवून घेऊन ‘एसएलपी’ फेटाळल्या.

राज्यभर ८०० ठिकाणी मतमोजणी व्हायची आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने ज्येष्ठ वकील ऐश्वर्या भाटी यांनी सांगितले की, मतमोजणी केंद्रांच्या परिसरात पूर्ण संचारबंदी पुकारण्यात येईल. मास्क, सोशल डिन्स्टन्सिंग, सॅनिटायजर यासह सर्व बंधनांचे मतमोजणी केंद्रांवर कसोशीने पान केले जाईल. प्रत्येक मतमोजणी केंद्राची याबाबतची जजबाबदारी वर्ग-१ च्या अधिकार्‍यांवर तर प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी प्रधान सचिव हुद्द्याच्या अधिकार्‍यावर असेल. उमेदवार व त्यांच्या एजन्टना कोराना ‘निगेटिव’ रिपोर्ट किंवा प्रतिबंधक लसीची दोनदा टोचणी करून घेतली असेल तरच प्रवेश दिला जाईल आणि निवकाल जाहीर झाल्यावर उमेदवार अथवा त्यांच्या राजकीय पक्षांना कुठेही मिरवणूक काढू दिली जाणार नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button