ट्रेनच्या शौचालयामध्ये प्रसुती, पालघरमध्ये धावत्या ट्रेनमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला!

palghar

पालघर : वांद्रे-गाजिपूर एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका गर्भवती महिलेने धावत्या ट्रेनमध्ये बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे . वांद्रे-गाजिपूर डाऊन ट्रेनच्या एस 12 डब्यात ही प्रसुती झाली. गुडिया विश्वकर्मा असं बाळाला जन्म दिलेल्या महिलेचं नाव आहे. बाळ आणि बाळंतीण दोघेही सुरक्षित आणि सुखरुप असून त्यांना सोमवारी (2 नोव्हेंबर) डिस्चार्ज देण्यात आला.

माहितीनुसार, राजेश विश्वकर्मा हे त्यांची गर्भवती पत्नी गुडिया आणि पाच वर्षीय मुलीसह रविवारी (1 नोव्हेंबर) रात्री वांद्रे-गाजिपूर या कोविड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानकात येताच गुडिया यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. गुडिया विश्वकर्मा यांना वेदना सुरु झाल्यानंतर त्यांनी थेट ट्रेनच्या शौचालयामध्ये जाऊन बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. राजेश विश्वकर्मा यांनी याची माहिती टीटीईला दिली. त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबत कळवलं. गाडी पालघर स्टेशनला येता येता महिलेची प्रसुती झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला.

राजेश विश्वकर्मा हे त्यांची गर्भवती पत्नी गुडिया आणि पाच वर्षीय मुलीसह रविवारी (1 नोव्हेंबर) रात्री वांद्रे-गाजिपूर या कोविड विशेष ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथील आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. वांद्रे येथून गाडी सुटल्यानंतर विरार स्थानकात येताच गुडिया यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. गुडिया विश्वकर्मा यांना वेदना सुरु झाल्यानंतर त्यांनी थेट ट्रेनच्या शौचालयामध्ये जाऊन बाळाला जन्म देण्याचा प्रयत्न केला. राजेश विश्वकर्मा यांनी याची माहिती टीटीईला दिली. त्यानंतर त्यांनी नियंत्रण कक्षाला फोन करुन याबाबत कळवलं. गाडी पालघर स्टेशनला येता येता महिलेची प्रसुती झाली. तिने गोंडस मुलाला जन्म दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER