कमी पटसंख्येच्या सुमारे दहा हजार शाळा बंद करण्याचा घाट

close schools around low enrollment

पुणे : राज्यातील कमी पटसंख्येच्या सुमारे दहा हजार शाळा बंद करण्याचा घाट शासनाने पुन्हा घातला आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांची संख्या कमी असलेली छोटी गावे, वस्त्या या ठिकाणची शाळा बंद झाल्यास मुलांच्या वाट्याला पायपीट येणार आहे. काही वेळा नकाशावर दुसऱ्या शाळेपर्यंतचे अंतर कमी दिसत असले तरी प्रत्यक्षात शाळेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कठीण असतो. वाहनांची सोय नसते. त्यामुळे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, शिवाय शिक्षकांच्या समायोजनेचा प्रश्न आणखी बिकट होईल, अशी भीती शिक्षक संघटनांना आहे.

कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शाळा सुरू आहेत. वीसपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करण्याचा विचार शासनाने पुन्हा सुरू केला आहे.

कमी पटसंख्येच्या शाळेचे नजीकच्या शाळेत समायोजन करण्यात यावे, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सध्या शाळांची माहिती घेण्याचे काम सुरू असून महिनाभरात त्याचा अहवाल तयार होईल. एकट्या नाशिक जिल्ह्यातीलच ३०० पेक्षा अधिक शाळा बंद होण्याची शक्यता आहे. शासनाच्या या निर्णयाविरोधात आवाज उठवण्याची तयारी विविध शिक्षक संघटनांनी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER