नेताजींचे छायाचित्र म्हणून त्यांच्या भूमिकेतील अभिनेत्याचा लावला फोटो! राष्ट्रपतींने केले अनावरण !

A photo of the actor in his role as Netaji's photo! President unveils!

दिल्ली : शनिवारी म्हणजेच २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या १२५ व्या जयंती निमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind)यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनमध्ये नेताजींच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मात्र ते छायाचित्र नेताजींचे नसून तो नेताजींवरील चित्रपटात नेताजींची भूमिका करणाऱ्या प्रसूनजित चॅटर्जी यांचा नेताजींच्या भूमिकेतील फोटो आहे!

या चित्राचे फोटो राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंटवरुनही पोस्ट करण्यात आलेत. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. नेताजींवरील ‘गुमनामी’ या चित्रपटात प्रसूनजित चॅटर्जी यांनी नेताजींची भूमिका केली होती. राष्ट्रपती भवनमध्ये लावण्यात आलेला फोटो त्या चित्रपटातील नेताजीं ( प्रसूनजित चटर्जीं ) चा आहे ! श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची कथा नेताजींच्या रहस्यमय मृत्यूच्या घटनेवर आधारित होती.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील खोचक प्रतिक्रिया दिली – “आता देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करु शकत नाही)”!

पत्रकार बरखा दत्त यांना हा फोटो पाहून धक्का बसल्याचे ट्विट केले. हा प्रकार खूपच लाजिरवाणा आहे, असे म्हटले.

अनेक नेटीजन्सनेही हा फोटो अभिनेता प्रसूनजित चॅटर्जींचा आहे, हे ओळखले आहे. एकाने गुमनामी चित्रपटाच्या कास्टींग (कलाकार निवडी)ला मानले पाहिजे असे म्हटले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER