एका फोटोनं बदललं आयुष्य… चहावाला बनला जगातला फेमस मॉडेल !

A photo changed life ... Tea became a world famous model!

“सडक से उठा के स्टार बना दुंगा” हा डायलॉग तुम्ही एकलाच असेल. आपणही चेष्टेत हा डायलॉग खूपवेळा बोलत असतो. अशाच एका माणसाची ही गोष्टय.आता हा डायलॉग ऐकला म्हणजे तुम्हाला वाटलं असेल आम्ही तुम्हाला अनुराग कश्यप बद्दल सांगतोय नाहीतर नागराज मंजुळेबद्दल. पण तसं नाहीये.

आजची गोष्ट आहे एका चाहावाल्याची. हा चहावाला आहे पाकिस्तानचा अरशद खान.अरशदची (Arshad Khan) कहाणी एकदम फिल्मी आहे.

तुम्हाला आठवतंय का, 2-4 वर्षापूर्वी एका मुलाचा फोटो खतरनाक व्हायरल झाला होता. निळ्या डोळ्याचा, आकाशी कुर्ता घातलेला, खतरनाक हँडसम मुलगा, त्याचा टपरीवर चहा बनवतानाचा फोटो पाहून जगभरातल्या लोकांना आश्चर्यच वाटलं. एखाद्या सिनेमात काम करायचं सोडून हा मुलगा चहाची टपरी का चालवतो असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्याचीच कहाणी आज जाणून घेणार आहोत. तर या मुलाचं नाव आहे, अरशद खान, याची पाकिस्तानात एक चहाची टपरी होती. एक दिवस तिथं चहा बनवत असताना जिया अली नावाची मुलगी तिथे आली. ती फक्त चहा पिऊन थांबली नाही. तुमच्या आमच्या सारखाच तिला प्रश्न पडला. दिसायला इतका देखणा असणारा मुलगा फक्त एका छोट्या चहाच्या टपरीवर चहा विकतोय हे पाहून तिने त्याचा फोटो घेण्याचं ठरवलं. तिला फोटो काढण्याचा छंद होता. तिने अरशदला एक फोटो काढू देण्याची विनंती केली. अरशदने मान्य केली. नंतर त्या फोटोचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे.

फोटो एवढा व्हायरल झाला, एवढा व्हायरल झाला, की विचारायची सोय नाही !त्या फोटो नंतर अरशदचं आयुष्यच बदललं. कोण म्हणे मॉडेलिंग कर, कोण म्हणे सिनेमात घेतो, कोण म्हणे आमचा अॅम्बॅसिडर हो… लय काय काय… रांगाच लागल्या. वेगवेगळया ऑफर अरशद खानला येऊ लागल्या. जगभरात त्याच्या फोटोला नावाजलं गेलं.

अरशद खान मॉडेलिंग करायला लागला. घरादाराचा नक्षाच बदलला. पैसा यायला लागला. पण अरशदने आता मॉडेलिंग आणि सिनेमा इंडस्ट्री सोडलीये. त्याचं कारण पण तसच झालं.अरशद एका म्यूजिक व्हडिओ मध्ये एका महिलेसोबत दिसला. त्याच्या घरच्यांना हे काम काही आवडलं नाही. आपली नाराजी त्यांनी अरशदला सांगितली. आणि बास ! अरशद ने इंडस्ट्री सोडली.

अरशद आतापर्यंत पाकीस्तानातला मोठा सेलिब्रेटी झालेला होता. अरशद ने इस्लामाबाद मध्ये आता स्वतःचा कॅफे सुरू केलाय, कॅफे चायवाला नावानं. तिथे जाणार्‍या लोकांना फक्त उत्कृष्ट चहाच मिळत नाही तर सेलिब्रिटी अरशद खानसोबत सोबत सेल्फी पण मिळतो. काही लोक अरशदच्या हातचा चहा पिण्याची मागणी करतात. त्यांना अरशद स्पेशल चहाही बनवून देतो.रात्रीत स्टार झालेल्या अरशदला गरीब मुलांसाठी एक संस्था सुरू करायची आहे. जिथे फक्त मुलांना शिक्षणच मिळणार नाही, तर वेगवेगळे कौशल्य आणि कसब शिकवले जातील. अशी संस्था उभारण्यासाठी अरशदने कामही सुरू केलय.

आहे की नाही अरशदची कहाणी एकदम फिल्मी…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER