शरद पवारांचा एक फोन महाराष्ट्रातील कोरोनाचे चित्र बदलवू शकतो, चंद्रकांत पाटीलांचा दावा

Chandrakant Patil-Sharad Pawar

पुणे : सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अश्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यातील राजकीय कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. अजित पवार पुणेकरांना उपलब्ध होत नसल्याची टीका चंद्रकांतदादांनी केल्यानंतर त्याला तितकेच तिखट प्रत्युत्तर अजितदादांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिले. त्यावर चंद्रकांतदादांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता थोडी सावध भूमिका घेत त्यावर ते बोलले. एवढेच नाही तर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल आदर आणि विश्वास दाखवत पवारांनी एक फोन केला तर राज्यातील कोरोना संकटाची परिस्थिती बदलेल, असा दावा केला. तसेच अजित पवार यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले. ते काल पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

यावेळी शरद पवारांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत चंद्रकांत पाटील म्हणाले की, संकटाच्या काळात काम करण्याचा शरद पवार यांना उत्तम अनुभव आहे. भूजच्या भूकंपाच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. किल्लारीचं संकट केवळ पवारांमुळंचटाळलं गेलं. आता ते आजारी आहेत. त्यामुळं ते घराबाहेर पडू शकत नाही. मात्र त्यांना घरात यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास त्यांचं मार्गदर्शन घेता येईल. त्यांचा एक फोन महाराष्ट्रातील विदारक चित्र पालटू शकतो,’ अशी सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी सरकारला केली.

चंद्रकांतदादा म्हणाले की, काही मंत्र्यांचा दिवस सकाळी ११ वाजता उगवतो. पण अजिदादा सात वाजता मंत्रालयात असतात हे खरे आहे. मात्र, त्यांच्यावर कामाचा ताण येत असेल तर त्यांनी पुण्यातून राज्य चालवावे किंवा पुण्याला दुसरा पालकमंत्री देऊन मुंबईतून राज्याचा कारभार पाहावा, अशी सूचना त्यांनी केली. अजित पवार उपलब्ध नाहीत असे मी म्हणालो होते. पण त्या दिवशी ते खरोखरंच २४ तास उपलब्ध झाले नव्हते. त्यांच्यावर टीका करण्याचा हेतू नव्हता. अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वच प्रकारच्या कार्यक्षमतेबद्दल मी बोलतोय. मात्र ते आता केवळ व्हिडिओ कॉलद्वारे सर्वांना उपलब्ध होत आहेत. त्यांनी तसे न करता आता लोकांना भेटले पाहिजे. लोकांना दिलाशाची गरज आहे, असा सल्लाही त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या आवाहनाला अभिजात पाटलांचा प्रतिसाद ; धाराशिव कारखाना उभारणार ऑक्सिजन निर्मितीचा पहिला प्रकल्प

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button