आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाला रोजगारासह तीन हजार कोटींचे पॅकेज द्या; नारायण राणेंची मागणी

Narayan rane

ठाणे :- भाजपचे (BJP) खासदार नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. राज्य सरकारच्या बेफिकीरमुळेच मराठा आरक्षण गेले. त्यामुळे या समाजाला रोजगार द्या, शिक्षणात सवलत द्या आणि तीन हजार कोटींचे पॅकेज द्या, अशी मागणी नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

आज नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरक्षणावरून ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) टीकास्त्र सोडले. भाजपच्या प्रत्येक मराठा नेत्याने जिल्ह्यांमध्ये जाऊन मराठा आरक्षण (Maratha Reservation) पक्षाची भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली आहे. समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आरक्षण रद्द होण्याआधी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने सामावून घ्यावे, अशी मागणी राणेंनी केली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत बर्‍याच चुका झाल्या. सुप्रीम कोर्टात आरक्षणाची बाजू मांडण्यात आघाडी सरकार अपयशी ठरले. कोर्टात ज्या मुद्द्यांवर मराठा आरक्षण रद्द झाले, त्याच मुद्यांवर भाजपा सरकारने हायकोर्टात आरक्षण टिकवले होते. आघाडीच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, वकील वेळेत न्यायालयात हजर झाले नाहीत, सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ केली. तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका आघाडी सरकारने केल्या, असे राणे यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकारकडून मराठा समाजाला मोठा दिलासा ;  मराठा तरुणांना EWS आरक्षण मिळणार  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button