अमेरिकेत कोरोनाचा नवा व्हेरिएंट

वॉशिंग्टन : अमेरिकेतील कोरोनाचा आलेख अद्याप चढताच आहे. या देशात आजपर्यंत कोरोनाचे एकूण 2 ,81,96,964 रुग्ण सापडले आहेत; तर 4,96,063 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील 44 राज्यांत आतापर्यंत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे एक हजार रुग्ण सापडले आहेत. यूएस सेंटर्स फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, या हजार रुग्णांमध्ये ब्रिटनमधील व्हेरिएंटची बाधा झालेल्या 968 रुग्णांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील व्हेरिएंटचे 73 तर ब्राझील व्हेरिएंटचे 35 रुग्ण आढळले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER