बंगालच्या राजकारणात नवी नोंद; पहिल्यांदाच डावे आणि काँग्रेसचा एकही आमदार नाही!

CPM - Congress Flags

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने (Trinamool Congress) तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. भाजपाने (BJP) ७७ जागांवर विजय मिळवला असून विरोधकाची भूमिका बजावणार आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डावे पक्ष आणि काँग्रेसचा (Congress) एकही आमदार विधानसभेत असणार नाही!

निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने २९२ पैकी २१३ जागांवर विजय मिळवला. भाजपाचे ७७ जागांवर उमेदवार जिंकले आहेत व राष्ट्रीय सेक्युलर मजलिस पार्टीचा १ आणि एक अपक्ष निवडून आला. काँग्रेस आणि डावे पक्ष खातेही उघडू शकले नाहीत. काँग्रेसला २.९३, तृणमूल काँग्रेसला ४८ टक्के तर भाजपाला ३८ टक्के मत मिळाली. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे ४४ तर माकपचे २५ आमदार निवडणून आले होते, हे उल्लेखनीय.

२०११ च्या निवडणुकीत डाव्यांची सत्ता संपुष्टात आणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सत्तेत आल्या. तेव्हा काँग्रेसचे ४२ आमदार निवडून आले होते. ४० जागा जिंकत डावे तिसऱ्या स्थानी होते. काँग्रेसने १९७७ मध्ये २०, १९८२ मध्ये ४९, १९८७ मध्ये ४०, १९९१ मध्ये ४३, १९९६ मध्ये ८२, २००१ मध्ये २६ आणि २००६ मध्ये २१ जागांवर विजय मिळवला होता. १९७७ पासून २००६ पर्यंत डावे सत्तेत होते. काँग्रेसनेही अस्तित्व कायम ठेवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button