सांगलीत मंगळवारी एक नवा कोरोनाबाधित

Sangli - Coronavirus

सांगली : सांगली जिल्ह्यातील मंगळवारी एका नव्या कोरोनाबाधिताची भर पडली असून एकूण रुग्णांचा संख्या 122 झाली आहे. यापैकी 68 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या 50 बाधित मिरजेच्या कोरोना हॉस्पीटलमध्ये दाखल आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. मंगळवारी करोनाबाधित आढळलेली 58 वर्षीय महिला तिच्या करोनाबाधित मुलाच्या संपर्कात आली आहे. ती तासगाव येथील विटा रोड परिसरात रहात होती. तिला मिरजेच्या करोना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER