रूपालीच्या घरी आली नवी डुग्गू

Rupali Bhosle

स्वतःची कार असावी असे स्वप्न प्रत्येक जण बघत असतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनतही करत असतो. असंच स्वप्न पाहिलं होतं अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने. आपल्या स्वप्नातली कार खऱ्या आयुष्यात आपल्या घराच्या दारात उभी राहते तेव्हा होणारा आनंद हा काही वेगळाच असतो. अशा आनंदाच्या वर्षावात सध्या अभिनेत्री रुपाली भोसले न्हाऊन गेली आहे. नुकतीच तिने स्वतःच्या वाढदिवशी स्वतःला नवी कोरी कार गिफ्ट केली आहे. या नव्या कारला तिने डुग्गू असं नाव दिलं असून हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आली माझ्या घरी डुग्गू अशी हटके कॅप्शनसुद्धा दिली आहे. रूपालीच्या वाढदिवसासोबत तिच्या नव्या कारलाही तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आई कुठे काय करते या मालिकेतील संजना या भूमिकेमुळे रुपाली भोसले सध्या चांगलीच चर्चेत आहे. यापूर्वी बिग बॉसच्या सीझनमध्ये रुपाली भोसले दिसली होती. आयुष्यात प्रचंड संघर्ष आणि चढउतार अनुभवल्यानंतर रूपालीच्या आयुष्यात गेल्या काही वर्षात अतिशय चांगले दिवस आले आहेत हे ती नेहमी मुलाखतींमध्ये सांगत असते. लग्नानंतर परदेशात तिला तिच्या नवऱ्याकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि त्यानंतर त्याच्या पासून वेगळी होत ती पुन्हा भारतात आली. खूप लवकर रूपालीवर तिच्या कुटुंबाची जबाबदारी पडल्यामुळे महाविद्यालयात असताना तिने खूप वेगवेगळ्या नोकऱ्या करून आई आणि भावाला सांभाळले आहे. रूपाली सांगते, प्रत्येक माणूस वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न बघत असतो त्याचप्रमाणे मी देखील खूप स्वप्न बघितली होती पण लहान वयामध्ये माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या पडल्यामुळे मला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हा परिस्थितीच तशी होती. परंतु आता माझे दिवस नक्कीच बदलले आहेत.

मध्यंतरी अशी एक वेळ होती जेव्हा माझ्या हातात काहीच काम नव्हतं. पण हिंदी सिरियल मला मिळाली आणि त्यानंतर माझं आयुष्य बदलून गेलं. सध्या कुठे काय करते या मालिकेतील संजना या भूमिकेने मला चांगली लोकप्रियता दिली. माझे हे काम प्रेक्षकांना आवडत आहे हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मला आयुष्याचा जोडीदारदेखील मिळाला असून लवकरच आम्ही लग्नही करणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून कार घेण्याचा संकल्प मी केला होता त्यासाठी मी खूप मेहनत करत होते .ही कार म्हणजे केवळ एक गाडी नव्हे किंवा एक इंजिन नव्हे तर ही कार म्हणजे माझं घर आहे. आपण आपल्या घराचे स्वप्न पाहत असतो तसेच मी माझं कारचे स्वप्न पाहिलं होतं. मी माझ्या कारला डुग्गू असं नाव दिलं आहे. प्रत्यक्षात वाढदिवशी 29 डिसेंबरला स्वप्नातली कार आयुष्यात आली. रूपाली सध्या नव्या कारच्या खरेदीमुळे प्रचंड उत्साहात आणि आनंदात आहे.

जेव्हा मी कार खरेदी करेन तेव्हा ती पांढर्‍या शुभ्र रंगाची असेल, असं रुपालीने ठरवलं होतं. त्यामुळे साहजिकच तिने खरेदी केलेली कार पांढ-या रंगाची आहे. जेव्हा ही कार आणण्यासाठी रूपाली शोरूममध्ये गेली तेव्हा तिने अतिशय मस्त पांढराशुभ्र ड्रेस घातला होता. या लुकमध्ये रूपाली खूप सुंदर दिसत होती. जशी गाडी तशी मी असं सांगणारा तिचा ड्रेस आणि गाडीचा रंग दोन्ही एकमेकीला मॅचिंग केलं होतं. रूपालीच्या कार इतकीच तिच्या स्टायलिश लुकमधल्या फोटोचीही तिच्या सोशल मीडिया पेजवर तुफान चर्चा सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER