६०० रुपयांना एक आंबा : नव्या हापूसचा सौदा

कोल्हापूर :- शाहू मार्केट यार्डात  गुरुवारी नवीन हापूस आंब्याचा (Hapus Mango) सौदा झाला. पाच ते सात हजार रुपये डझन तर पेटीस २५ ते ३० हजार रुपये दर मिळाला. नाविद मुश्रीफ यांच्या हस्ते हा सौदा झाला. नव्या आंब्याची चव चाखण्यासाठी किमान ६०० रुपये द्यावे लागणार आहेत.

मार्केट यार्डात देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग  येथून १७ हापूस पेटी आंब्यांची  आवक झाली. चालू हंगामातील ही पहिलीच आवक आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत आब्यांचा सौदा झाला. यावेळी डझनाला पाच ते सात हजार रुपये दर मिळाला. तर पेटीची ३० हजार रुपयांपर्यंत विक्री झाली. इब्राहिमभाई बागवान आणि इकबाल बागवान यांच्या अडत दुकानात भाई आयरेकर ( देवगड), सचिन गोवेकर (मालवण), वासुदेव चव्हाण (देवगड) या बागायतदारांकडून ही  आंब्यांची  आवक झाली. यावेळी समितीचे प्रशासकीय मंडळाचे सदस्य, अधिकारी, कर्मचारी, अडते, खरेदीदार, व्यापारी, शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER