भंडाऱ्याच्या घटनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय ; अजित पवारांनी दिले आदेश

Ajit Pawar

मुंबई :- भंडाऱ्यातील शासकीय सामान्य रुग्णालयात आग लागल्यामुळे 10 नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश दिले आहे.

भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिले.

अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरू ठेवण्याचे तसंच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER