किमान सहा ते आठ आठवड्यांचा लॉकडाउन हवा; ICMRचे प्रमुख डॉ. बलराम भार्गवांचे मत

Maharashtra Today

मुंबई : कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा भारताला चांगलाच फटका बसला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे. देशातही लॉकडाउन (Lockdown) लावण्यात यावे, अशी मागणी काही राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे प्रमुख बलराम भार्गव (Balram Bhargava)यांनी लॉकडाउनसंबंधी महत्त्वाचे विधान केले आहे.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी किमान सहा ते आठ आठवडे लॉकडाउन गरजेचा आहे, असे मत बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये चाचणी दर १० टक्क्यांच्या पुढे आहे. तिथे लॉकडाउनची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या भारतातील ७१८ जिल्ह्यांपैकी भारताच्या तीन चतुर्थांश भागात पॉसिटिव्हिटी रेट १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामध्ये नवी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरुचा समावेश आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात लॉकडाऊन जाहीर करावा, अशी मागणी काही राजकीय नेते करत आहे. मात्र, यासाठी केंद्र सरकार इच्छुक नाही. अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेता केंद्राने लॉकडाउनचा निर्णय राज्यांवर सोपवला आहे.

ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांनी केंद्रावर टीका न करता कोरोना संकटाला उत्तर देण्यास उशीर झाल्याचे मान्य केले आहे. “मला वाटते १० टक्क्यांची शिफारस मान्य कऱण्यास उशीर झाला. १५ एप्रिलला टास्क फोर्सने सरकारला १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असणाऱ्या ठिकाणी लॉकडाउन करण्याची शिफारस केली होती.” अशी माहिती त्यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button