पवारांच्या एका पत्राने प्रशासन हलले, १५ साखर कारखान्यांकडून ऑक्सिजनची निर्मिती शक्य

Maharashtra Today

पुणे : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची मागणीही वाढू लागली आहे. काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन मिळाला नसल्याने रुग्णांचे मृत्यूदेखील झाले आहे. ही बाब समजताच वसंतदादा शूगर इस्न्टिट्यूटचे (व्हीएसआय) ( Vasantdada Sugar Institute)अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मिती करण्याच्या सूचना साखर आयुक्तालयाला केल्या आहेत. त्यांच्या एका सूचनेने प्रशासन कामाला लागले असून एक एक नव्हे तर तब्बल १५ साखर कारखान्यांकडून ऑक्सिजनची निर्मिती (produce oxygen from 15 sugar factories)होण्याची शक्यता आहे.

पवारांच्या सूचनेनुसार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऑक्सिजन निर्मिती करु शकणाऱ्या साखर कारखान्यांचा आढावा घेतला असता, राज्यात सद्यस्थितीत किमान १५ साखर कारखाने हे ऑक्सिजननिर्मिती करू शकणार आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांद्वारेही ऑक्सिजनची गरज भागविली जाणार आहे. राज्यात ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत असल्याने ऑक्सिजन उपलब्धतेसाठी प्रशासनाकडून विविध मार्गांनी प्रयत्न करण्यात येत आहेत. साखर कारखान्यांनी ऑक्सिजननिर्मितीचे प्रकल्प उभारण्याबाबतची सूचना पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्र ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी साखर आयुक्तालयाला दिले आहे. त्यानुसार साखर आयुक्त गायकवाड यांनी याबाबत साखर कारखान्यांशी संपर्क साधून आढावा घेतला आहे.

याबाबत गायकवाड म्हणाले‘ राज्यातील साखर कारखान्यांपैकी सुमारे १५ कारखाने हे ऑक्सिजनची निर्मिती करण्याच्या स्थितीत आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. साखर कारखान्यांकडे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्यासाठी किमान चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र, किमान १५ कारखान्यांमध्ये तातडीने प्रकल्प सुरू होऊ शकतात’ ‘साखर कारखान्यांना ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक निधीची आवश्यकता भासणार आहे. बँकांकडून कर्ज देताना ऑक्सिजन विक्रीची खात्री आहे का, याची विचारणा केली जाते. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे’ असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात सहकारी आणि खासगी असे १९० कारखाने आहेत. त्यापैकी यंदाच्या हंगामात १८८ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. या कारखान्यांपैकी सर्व कारखान्यांची ऑक्सिजननिर्मितीची क्षमता नाही. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर किमान १५ साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजननिर्मिती प्रकल्प उभारण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू केले गेले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button