येत्या २४ तासांत अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार !

Heavy Rain Alert - Cyclonic Storm in SE Arabian Sea

मुंबई : अरबी समुद्रात (Arabian Sea) चक्रीवादळ (Hurricane) धडकणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे येत्या २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात १५ ते १७ मे रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात परिणाम
हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या २४ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होईल. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून १८ मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करणार आहे. त्यानंतर चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहचेल. महाराष्ट्र किनारपट्टीवर १५ ते १७ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला. तर काही भागांत पाऊसही पडला. तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अशीच अवस्था आहे.

चक्रीवादळाचे परिणाम
मुंबई, ठाणे, पालघर – पावसाच्या हलक्या सरी
कोकण – मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा
रायगड – मोठा पाऊस
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा – तुरळक पाऊस
विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट

समुद्रात न जाण्याचा सल्ला
सुदैवाने कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून हे चक्रीवादळ पुढे जात असले तरी मुंबईला त्याचा धोका नाही. मात्र, मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल. या चक्रीवादळात समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता आहेत. तसेच वाऱ्याचा वेगही प्रचंड आहे. मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button