कांद्याची शंभरी ; मागणीपेक्षा आवक घटली

Onion

कोल्हापूर : परतीचा पाऊस, हॉटेल रेस्टॉरन्ट (Hotel-Restaurant) सुरु झाल्याने वाढलेली मागणी, निर्याती बंदीनंतर उत्तर भारताकडे जुन्या कांद्याचा (Onion) होणारा पुरवठा यामुळे कांद्याचे दर वाढतच आहेत. बाजार समितीमध्ये ५० ते ८० रुपये असणारा कांदा घाऊक बाजारात ९० ते ९५ रुपये किलोवर गेला आहे. मागणी आणि पुरवठा यात तफावत आल्याने लवकरच कांदा शंभरी गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे झाल्यास सामान्य लोकांच्या घरातील बजेट कोलमडू शकते.

परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. आता सर्वसामान्यांना कांद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. उन्हाळी कांद्याचा साठा संपत आला आहे. तर नवीन पीक येण्यास विलंब लागणार असल्यामुळे कांद्याचा तुटवडा आहे. मागणीपेक्षा आवक कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढत आहेत. अजून दोन महिने कांदा चढ्याने भावाने विक्री होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे रब्बीत पेरणी केलेल्या कांद्यांची रोपे शेतातच कुजली आहेत.

खरीपातील कांदा काढणीत पावसाचा अढथळा ठरला. उन्हाळी कांद्याचा साठा संपत चालला आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. नवीन पीक येण्यासाठी वेळ असल्यामुळे उपलब्ध कांद्याचे दर वाढले असून अशीच स्थिती राहिली तर दसऱ्यापर्यंत किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी पार करण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER