अहमदाबाद : शाळेच्या इमारतीला भीषण आग

A fire that broke out at Ankur School - Maharastra Today
A fire that broke out at Ankur School - Maharastra Today

अहमदाबाद :- अहमदाबादच्या कृष्णानगर परिसरातील अंकुर स्कूल या शाळेत अचानक आग लागली. या आगीत चार विद्यार्थी अडकल्याची भीती होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. शाळेच्या इमारतीमधून आगीचे मोठ-मोठे लोळ उठत होते.

अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत अडकलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सध्या कूलिंग प्रोसेस सुरू आहे.

शाळेच्या इमारतीतून आगीचे मोठ-मोठे लोळ उठत होते. पण, अशात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, सध्या कोरोनामुळे सर्व शाळा बंद आहेत. मग या शाळेत विद्यार्थी आले कुठून? या शाळेत आग कशी लागली? याबाबत सध्या काहीही माहिती मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button