ठाण्यातील अरकेडिया शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग

Thane

ठाणे : ठाण्यात पातलीपाडा हिरानंदानी इस्टेट येथील अरकेडिया शॉपिंग सेंटरमधील एका  मेडिकल दुकानासह सहा दुकानांना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.

या आगीत वेलनेस मेडिकल, प्राइम हार्डवेअर, रेनबो शॉपी, सिटी वाइन्स आणि गौरव स्वीट्स आशा सहा दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ‘सकाळी ८ च्या सुमारास ही आग लागली.

आग  नियंत्रणात आणण्यासाठी सर्व पथक घटनास्थळी आहेत. आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. आतापर्यंत कोणीही जखमी झाले नाही. ’ असे आरडीएमसीचे ठाणे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER