कोलकातातील इमारतीला भीषण आग; सात जणांचा मृत्यू

कोलकाता :- कोलकाता (Kolkata) येथील स्ट्रंड रोडवर एका इमारतीला सोमवारी सायंकाळी भीषण आग (Huge fire) लागली. इमारतीच्या १३व्या मजल्यावर लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या आगीत दोन कर्मच्याऱ्यांसह सात जणांचा (7 Killed) मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या इमारतीत पूर्व रेल्वेचे विभागीय कार्यालय आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे, तर पीडित कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरीही दिली जाईल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडून शोक व्यक्त

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्याचबरोबर मृतांच्या कुटुंबीयाला दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तसेच घटनेच्या तपासासाठी चार रेल्वे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER