माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला १२ वर्षे खुंटीला बांधून ठेवले

- जयसिंगराव गायकवाड यांची भाजपावर टीका

Jaisingrao Gaikwad

औरंगाबाद : माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला १२ वर्षे खुंटीला बांधून ठेवले, अशी खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) नुकताच प्रवेश केलेल माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) यांनी भाजपावर (BJP) टीका केली.

ते औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांच्या प्रचारा मेळाव्यात बोल्ट होते. भाजपामध्ये सामूहिक निर्णय प्रक्रिया संपुष्टात आली आहे. आता नियमानुसार कोणतेही काम होत नाही. १२ वर्षे अपमान सहन केला, सर्व काही तपासूनच पक्ष सोडला, असे गायकवाड म्हणाले.

चंद्रकांत पाटलांवर टीका
आम्ही अनेकदा जेलमध्ये गेलो आहोत. चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केले आहे का? त्यांना पोलिस कस्टडी माहिती आहे का? असे प्रश्न करत जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपायाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर टीका केली.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यामुळे जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER