शरद पवारांकडून मदतीचा हात, बारामती कोविड सेंटरला २५ लाखांची मदत

Maharashtra Today

बारामती :- बारामती शहरात कोरोनाच्या (Corona) वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरला ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. पवार यांनी सातव कुटुंबिय व डॉ. सुनील पवार यांनी सुरु केलेल्या धों. आ. सातव कोविड हॉस्पिटलला २५ लाखांची मदत केली (Rs 25 lakh to Baramati Covid Cente) आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्यापासून पवार यांचे बारामतीवर विशेष लक्ष आहे. मागील वर्षी कोरोनाच्या सुरवातीच्या काळात रेमडेसिव्हर इंजेक्शन (Remedesivir injection) कोविड उपचारासाठी महत्वाचे ठरले होते. यावेळी पवार यांनी सर्वसामान्य बारामतीकरांसाठी १०० इंजेक्शन मोफत उपलब्ध करुन दिले होते. यंदाच्या वर्षी देखील रेमडेसिव्हीरचा तुटवडा सुरु असताना पवार यांनी सुमारे ४५० इंजेक्शन पाठवत कोरोना संकटात बारामतीला मदतीचा हात दिला होता.त्यापाठोपाठ आता थेट २५ लाखांची मदत केली आहे. त्यामुळे कोविडमुक्त बारामतीसाठी या निधीची मदत होणार आहे.

माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव यांनी मुंबई येथे शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली होती. त्यावेळी पवार यांना सातव यांनी या उपक्रमाची माहिती घेतली होती. त्यानंतर पवार हे गुरुवारी गोविंदबाग निवासस्थानी मुक्कामी आले होते. त्यांनी सातव यांना बोलावून हा २५ लाखांचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केला.यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, गटनेते सचिन सातव, माळेगावचे संचालक नितीन सातव, नगरसेवक सूरज सातव आदी याप्रसंगी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांवरील पीएचडी प्रदान, मात्र स्वभावाचं गूढ आद्यपही कायम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button