IND vs ENG: सामन्यादरम्यान ऋषभ पंत आणि बेन स्टोक्स यांच्यात जोरदार वादविवाद, पंचांना करावा लागला हस्तक्षेप

Rishab Panth-Ben Stoke

ऋषभ पंत (Rishab Panth) स्टंपच्या मागे असो वा पुढे, त्याच्या आणि विरोधी खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय बर्‍याचदा पुढे येतो. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी असेच काहीसे घडले, त्याचा बेन स्टोक्सशी वाद झाला.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दिवस रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अजिंक्य रहाणे यांच्या नावावर होते. या दोन्ही खेळाडूंनी मिळून टीम इंडियाला कठीण परिस्तितीतून बाहेर काढले. तथापि, शनिवारी खेळाचा शेवटचा क्षण ऋषभ पंत आणि बेन स्टोक्स यांच्यामुळे चर्चेत आला होता.

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर सामन्याच्या शेवटच्या क्षणी ऋषभ पंत आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांच्यात जोरदार वाद झाला. हे प्रकरण तापलेले पाहून फील्ड पंच हस्तक्षेप करण्यासाठी पोहोचले आणि वातावरण शांत केले.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी ८८ षटके खेळली गेली होती, ऋषभ पंतला जो रुटचा ८७ वा षटक दिवसाचा शेवटचा षटक ठरावा अशी इच्छा होती. अशा परिस्थितीत तो एका चेंडूपासून दुसरा चेंडू खेळण्यासाठी बराच वेळ घेत होता. मग स्लिपमध्ये उभे असलेला बेन स्टोक्स याने नाराज झाला आणि पंतला काहीतरी सांगू लागला.

टीम इंडियाचे माजी कसोटी सलामीवीर वसीम जाफर यांनी ऋषभ पंत आणि बेन स्टोक्स यांच्यातील चर्चेबद्दल एक मजेदार ट्विट केले. तो मुंबई शैलीत म्हणाला, ‘जब तक ये खेल खत्म नहीं होता अपुन इधरिच है’.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER