मदतीचा एक घास : लॉकडाऊनमध्ये गरजूंसाठी प्रणिती शिंदेंनी लाटल्या पोळ्या

Praniti Shinde

सोलापूर : लॉकडाऊनमुळे (Lockdown) अनेक गरीब, भिक्षूक, बेघर यांचे मोठे हाल होत आहेत. बऱ्याच लोकांना दोन वेळचे जेवणही नाही. अशा कठीण काळात अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते पुढे आले आहेत. काँग्रेसतर्फे (Congress) सोलापुरात एक स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ‘मदतीचा एक घास’ या उपक्रमाच्या अंतर्गत शहरातील गरीब, बेघर, गरजूंना आणि भिक्षूक यांच्यासाठी जेवणाची सोय करण्यात येत आहे. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी स्वत: पोळ्या तयार करून आपल्या घरापासून उपक्रमाची सुरुवात केली.

या उपक्रमात कार्यकर्तेदेखील मोठ्या उत्साहात सहभागी झाले आहेत. शहरातील विविध झोपडपट्ट्या, कामगार वस्ती तसेच रस्त्यावरील गरजूंना जेवणाचे वाटप काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत. दररोज १५०० ते २००० पोळ्या गरजूंना वाटप करण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जात आहे. हा उपक्रम लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविषयी समाजातील सर्वच नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button