गुजराती बांधवांसाठी येत्या रविवारी भव्य मेळावा ; उद्योगपती आणि व्यावसायिक करणार शिवसेनेत प्रवेश

CM Uddhav Thackeray

मुंबई : मुंबईतील गुजराती बांधवांची मोठी संख्या पाहता आता शिवसेनेने गुजराती (Gujarati brothers) बांधवांनाही आपले करण्यासाठी. त्यांच्या जवळ जाण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. मराठीजनांसोबतच गुजराती बांधवांनाही मुख्यमंत्री असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आता आपले वाटू लागले आहेत.

मुंबईत शिवसेनेचे गुजरात बांधावांसाठीचे नुकतेच दोन मेळावे पार पडलेत. त्यानंतर आता शिवसेनेच्या वतीने गोरेगाव येथे गुजराती बांधवांचा भव्य मेळावा होणार आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी रविवार 21 फेब्रुवारी रोजी मुंबईतील हा तिसरा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये 31 उद्योगपती आणि व्यावसायिक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

गुजराती बांधवांचा शिवसेनाला मोठा पाठिंबा मिळत आहे. गुजराती बंधू हेमराज शाह यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत नुकतेच दोन मेळावे पार पडले आहेत. त्यांनतर आता 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता सरदार पटेल हॉल, सिटी सेंटरसमोर, एस. व्ही. रोड गोरेगाव (पश्चिम) येथे तिसरा मेळावा आयोजित केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून हा मेळावा होणार असून प्रथम येणा-या शंभर लोकांना सभागृहात प्रवेश दिला जाणार असल्याचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि बिरेन लिंबाचीया यांनी स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : ठाकरे सरकार आल्यापासून झुंडशाही बळावली आहे : भाजप नेत्याची टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER