प्रभू श्रीरामांवर बनणार भव्य चित्रपट

Ram

अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्यास सुरुवात झाली आहे. प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेल्या या जागेत भव्य राममंदिर असावे अशी समस्त देशवासियांची भावना होती. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली आणि राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली. प्रभू श्रीरामांच्या काही कथांवर चित्रपट तयार झाले परंतु आता प्रभू श्रीरामांच्या जीवनावर एक भव्य चित्रपट तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘रामायण’ ठेवण्यात येणार असून या चित्रपटाच्या स्पेशल इफेक्टससाठी ऑस्ट्रेलियातील एलेक्स प्रोयास कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट गॉड ऑफ इजिप्तसाठी स्पेशल इफेक्ट्सचे काम केलेले आहे. या चित्रपटाची निर्मिती मुंबईतील प्रख्यात उद्योगपती गुरुस्वरूप श्रीवास्तव करणार आहेत.

गुरुस्वरूप श्रीवास्तव यांनी यापूर्वी क्रिशसह अनेक चित्रपटांच्या निर्मितीसाठी आर्थिक मदत केलेली आहे. गुरस्वरूप यांनी ‘रामायण’ चित्रपटाबाबत माहिती देताना सांगितले, प्रभू रामांच्या जीवनावर चित्रपट तयार करणे हे माझे स्वप्न आहे. या चित्रपटासाठी केवळ भारतीयच नव्हे तर परदेशातील तंत्रज्ञांचीही मदत घेणार आहे. या चित्रपटाचे संवाद कुमार विश्वास लिहिले असून त्यांच्याकडेच गीते लिहिण्याचीही जबाबदारी सोपवली आहे. प्रख्यात संगीतकार गायक शंकर महादेवनही या चित्रपटासाठी गीते लिहिणार आहे. सध्याच्या काळात प्रभू श्रीरामांनी दाखवलेल्या मार्गावरून चालणे कसे आवश्यक आहे ते मी या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या तरुण पिढीला ही माहिती देणे आवश्यक आहे असेही त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामांचे पुष्पक विमान उतरण्याचे शूटिंग आग्र्यातील ताजमहलजवळ केले जाणार असल्याची माहिती देऊन गुरुस्वरूप म्हणाले, याबाबतची सगळी तयारी सुरु असून संभवतः पुढील वर्षी आम्ही या महत्वाकांक्षी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. स्पेशल इफेक्ट्सला वेळ लागणार असल्याने जर काम झाले तर पुढील वर्षी नाही तर त्याच्या पुढील वर्षी चित्रपट प्रदर्शित केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER