आता दिशा पटानीचासुद्धा “रसोड़े में कौन था?” व्हिडीओ होत आहे व्हायरल, एकदा नक्की बघा

Disha Patani.jpg

आजकाल प्रत्येक जण सोशल मीडियावर हे विचारत आहे – “रसोड़े में कौन था?” स्टार प्लसवरची मालिका ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेचा हा डायलॉग रात्रभरात व्हायरल झाला. व्हिडीओला गाण्याचे रूप देणारे ऑनलाईन क्रिएटर यशराज मुखाते यांची बरीच चर्चा होत आहे. आता याच भागात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आपल्या लाडक्या डॉगीबरोबर मस्ती करताना दिसत आहे. यात दिशा पटानी “रसोड़े में कौन था?” असे विचारत आहे.

ही शैली दिशाच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. सांगण्यात येते की, यशराज मुखाते यांनी बनवलेल्या त्या व्हिडीओने बरीच सुर्ख्या मिळवल्या आहेत. आतापर्यंत बॉलिवूड सेलिब्रिटी राजकुमार राव, सान्या मल्होत्रा आणि कार्तिक आर्यन आणि राजकारणाशी संबंधित असलेल्या संबित पात्रा आणि स्मृती इराणी यांनीदेखील या व्हिडीओची चर्चा केली आहे.

 

View this post on Instagram

 

#rasodemaikauntha 🧐

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER