पवईत हिरानंदानी येथील एका इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात

Fire

मुंबई : पवई येथील हिरानंदानी भागात डेल्फी बिल्डिंगमध्ये पहाटे सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.सकाळी सव्वासहाच्या सुमारास इमारतीच्या पाचव्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली व अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप कळू शकलं नाही. ही आग कशामुळे लागली याचा शोध सध्या सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER