मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वीना मास्क प्रवेश केल्यास होणार 200 रुपये दंड

Fine Withoutmask

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त यांनी एका सूचनेद्वारे मुंबईकरांना हे आवाहन केले आणि सार्वजनिक स्थळांवर विना मास्क आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल व सोबतच त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल. याआधी ही कारवाई बीएमसी मार्फत केली जात होती. परंतु आता रेल्वे स्थानकात ही विना मास्क फिरल्यास दोनशे रुपये इतका दंड आकारण्यात येईल.

मुंबईतील अतिशय गजबजलेले स्थानक म्हणजे बोरिवली. बोरिवली स्थानकामध्ये या मोहिमेची सुरुवात झाली असून पोलिस अधिकारी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर व प्रवाशांवर कारवाई करताना दिसत आहेत.

मुंबईतील सर्वात गर्दीचे ठिकाण म्हणजे रेल्वे स्थानके व मुंबईतील लोकल मधील रेल्वे स्थानकांमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली आहे. कोरोना काळामध्ये काही प्रमाणात रेल्वेतील प्रवासी कमी झाले होते परंतु आता पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढले असून यासाठी कुठेतरी लोकल रेल्वे ने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना सुद्धा जबाबदार धरण्यात येत आहे. याआधी लोकल रेल्वे मध्ये सवलत देण्यात आली परंतु रेल्वे प्रवासी मुख पट्टी म्हणजेच मास्क चा नियमित वापर करत नाही त्यामुळेच कोरूना प्रसार वाढण्यास मदत होत आहे.

मुंबई उपनगरात जवळपास 2985 लोकल ट्रेन चालत आहेत त्यांनी सेवा एकूण सेवेच्या 95 टक्के इतकी आहे एका अंदाजानुसार सर्वसाधारणपणे 50 लाख प्रवासी लोकल रेल्वेने प्रवास करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER