
रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोना पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊन असतानासुद्धा बाईक किंवा फोर व्हिलरमधून रस्त्यावर आलेल्यांवर कारवाई करत या दोन महिन्यांच्या काळात पोलिसांनी २८ हजार ५९९ वाहन चालकांकडून तब्बल १ कोटींचा दंड वसूल केला आहे.
मुख्यत्वे यामध्ये दंड वसूल करण्यात आला आहे तो हेल्मेट न वापरणाऱ्यांकडून. अशा तब्बल १३ हजार १५४ बाईकस्वारांकडून ६५ लाखांचा दंड वसुल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे जिल्ह्यात हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांची संख्या कमालीची वाढली आहे. जवळपास ९५ टक्के दुचाकीस्वार हेल्मेट वापरत असल्याची माहिती जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला