महिलांच्या सेक्सविषयी बोलणारा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

Dolly Kitty Aur Woh Chamakte Sitare

ब्रह्मचर्य स्वीकारलेले सोडून सेक्स प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. पुरुषांच्या सेक्सबाबत चर्चा होते; परंतु महिलांच्या सेक्सबाबत खुलेपणाने चर्चा होत नाही आणि महिलाही त्याबाबत बोलत नाहीत. मात्र चित्रपटात याला कधी कधी वाचा फोडण्याचा प्रयत्न होते. जसे काही वर्षांपूर्वी ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ (Lipstick Under My Burkha) चित्रपटात हा विषय मांडण्यात आला होता. आणि आता पुन्हा एकदा या विषयाला हात घालण्यात आला आहे.

Dolly Kitty Aur Woh Chamakte Sitare - Wikipediaहा चित्रपट १८ सप्टेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. ‘डॉली, किट्टी और वो चमकते सितारे’ (Dolly, Kitty Aur Woh Chamakte Sitare) या नावाने हा चित्रपट तयार करण्यात आला असून यात भूमी पेडणेकर, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मेसी, अमोल पालेकर, कुब्रा सैत आणि करण कुंद्रा महत्त्वाच्या भूमिका साकारीत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलांनाही शारीरिक भूक असते हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले आहे. ट्रेलरमध्ये बोल्ड डायलॉग्सही आहेत. bचित्रपटात किट्टी (भूमी पेडणेकर) आणि डॉली (कोंकणा सेन शर्मा) या दोन बहिणींची कथा दाखवण्यात आलेली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER