औरंगजेबाच्या सैन्याचे लचके तोडून एका कुत्र्यानं लाहोरु राज्य वाचवलं होतं!

Maharashtra Today

जगाच्या इतिहासात १३ वं शतक सर्वात रक्तरंजित शतक मानलं जातं.कारण या दरम्यानं मंगोलांनी चीनपासून रशियापर्यंत आणि नंतर बगदादपासून पोलंडपर्यंत स्वतःच्या राज्याच्या सीमा रक्ताच्या शाईने विस्तारल्या होत्या. भारतातही तेव्हा मोठ्या प्रमाणातहिंसा सुरु होती. नंतर उजाडलं १६ वं शतक. भारतात मुघलांनी पाय जमवले होते. औरंगजेबाच्या हतात संपुर्ण सत्ता होती. तो भारतातला सर्वात शक्तीशाली शासक होता. त्याच्या सेने बल मोठं होतं. भारतातल्या मोठ मोठ्या साम्राज्यांनी त्याच्यापुढं गुडघे टेकले; पण एक राजा असा होता ज्याला झुकणं माहिती नव्हतं.

तो काळ होता १६७० चा. राजस्थान आणि हरियाणाच्या सीमेवर ‘लोहारु’ (Lahore) नावचं राज्य होतं. ज्या राजाचं नाव होतं ‘ठाकुर मदनसिंह.'(Thakur Madansingh) त्यांच्या दिलदार स्वभाची ख्याती दुरदेशापर्यंत पसरली होती. दान धर्म आणि गरिबांची मदत करण्यात ते नेहमी पुढाकार घ्याचे. त्यांच्यासाठी प्रजा वाटेल ते करायला तयार होती. ठाकुर यांना एक पत्नी आणि ‘महासिंह’ आणि ‘नौराबाजी’ नावची दोन मुलं होती. दोन्ही मुलं शस्त्रविद्येत पारंगत होती. ठाकुरांच्या कार्यकाळात सर्वकाही व्यवस्थतीतसुरु होतं.

त्यांच्या मुलां इतकाच ठाकुरांना प्रिय होता ‘बख्तावर सिंह.’ बख्तावर २४ तास ठाकुरांसोबत असायचा. बख्तावरकडे कोणती संपत्ती नव्हती. त्याच्याकडे जर काही होतं तर एक प्रामाणिक श्वान. या श्वानाबद्दलच्या अनेक नोंदी इतिहासात आहे. ‘बख्तावरचं कुत्रं’ अशी नोंद इतिहासानं त्यांच्याबद्दल घेतली आहे. अचानक होणारा हल्ला, संशयिताचा तपास आणि हल्ल्याच्या आधी सावध करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. इतकंच नाही तर राज महालात राहणाऱ्या लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर होती.

औरंगजेबनी उघडली मोहिम

१६७१ मध्ये लोहारु राज्याची संपत्ती प्रचंड होती. औरंजेबाला मोठ्या प्रमाणात कर या राज्याकडून वसूल करु शकतो. औरंगजेबानं लोहारु राज्याला पत्र लिहून मिळकतीतला काही हिस्सा मुघलांना देण्यासंबंधी सांगितलं. बदल्यात आम्ही तुम्हाला सुरक्षा पुरवू असं औरंगजेबानं लोहारु वाल्यांना सांगितलं. ठाकुर मदनसिंह यांनी औरंगजेबाचा हा प्रस्ताव धुडकवुन लावला. आम्ही आमच्या राज्याची पुर्ण सुरक्षा करु शकतो असं उत्तर दिलं. या उत्तराची अपेक्षा औरंगजेबाला नव्हती. त्यानं हिसारच्या सुभेदार अल्फू खानला आदेश दिला की लाहूरुच्या ठाकुर मदनसिंहाला त्याच्या समोर उभं केलं जावं बदल्यात युद्ध झालं तरी चालेल. अल्फू खाननं वेळ न दवडता युद्धाची तयारी सुरु केली. गुप्हेरांनी ही खबर ठाकुर मदनसिंह यांच्या कानावर घातली. तो पर्यंत अल्फू खानची सेना लोहारु साम्राज्याच्या सीमेवर येऊन ठेपली.

आणि श्वानानं युद्धात उडी घेतली

बख्तावर युद्धात उतरला. एक प्रामाणिक श्वान त्याच्या मालकाला जाईल तिथं सोबत देत असतो. म्हणून बख्तावरच्या घोड्यामागं त्याचं श्वानही युद्धासाठी उभं ठाकलं. खानाच्या सैन्यापुढं घोडे होते आणि हत्तीदेखील. रणभुमित मदनसिंह यांच्याबाजून कुत्रं मैदानात उतरल्याचं पाहून तो कुत्सित हसला. त्याला वाटलं की ठाकूर इतके कमजोर आहेत की युद्धासाठी त्यांना कुत्र्यावर अवलंबून रहावं लागतंय. ठाकुर मदनसिंह यांची दोन्ही मुलं महासिंह आणि नौराबाजी यांच्या पराक्रमामुळं मुघल सैन्याची त्रेधातिरपीट उडाली. बख्तावरने आघाडी सांभाळली आणि त्याच्या कुत्र्याने ही कमाल दाखवली. तो मुघल सैन्याच्या पाठी लागायचा आणि त्यांना पळवत पळवत बख्तावरकडे आणायचा. बख्तावर त्यांना जीव घ्यायचा.

युद्धात महासिंह आणि नौराबाजी जबदस्त घायाळ झाले. लढता लढता शहिद झाले. बख्तावर जखमी होऊनही लढत होते. त्यांना खानाच्या सैन्या पुढं झुकणं मंजूर नव्हतं. बख्यावर यांनी १०० मुघल सैनिकांचा जीव घेतला तर त्यांच्या श्वानानं २८ मुघल सैनिकांना यमसदनी धाडलं. लढता लढता ते श्वान मालकाच्या डोळ्यासमोर मेलं. खानचं सैन्याला पराभवाची जाणीव झाली. ते शस्त्र टाकून पळाले. लाहोरी राज्य सुरक्षित राहिलं त्या बख्तावर आणि त्याच्या श्वानाच्या पराक्रमामुळं. दोघे लढता लढता शहिद झाले. त्यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button