कोरोनाबाधिताची माहिती लपवणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल

Case Registered Against Doctor

रत्नागिरी/प्रतिनिधी : कोरोनाबाधित होऊन मृत्युमुखी पडलेल्या खेड तालुक्यातील कालच्या रुग्णाची माहिती लपवल्याबद्दल खेड मधील खासगी डॉक्टरवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिकांच्या तक्रारीनंतर खेडमधील दोन रेशन दुकानदारांचा परवाना रद्द

डॉ जावेद महाडिक असे या डॉक्टरचे नाव आहे. कोरोनाबधित रुग्ण परदेशातून आलेला माहीत असताना तसेच त्याला कोरोना संसर्गजन्य लक्षणे दिसत असताना प्रशासनाला न कळवता कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा संभव असलेली कृती केल्याप्रकरणी तसेच लोकसेवकांच्या आदेशाची अवज्ञा केल्या प्रकरणी डॉ. जावेद महाडिक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.