‘सावधान इंडिया’च्या आर्ट डायरेक्टरसह एक क्रू मेंबर अपघातात ठार

A crew member along with the art director of 'Savdhan India' was killed in an accident

दिल्ली :- सावधान इंडिया (Savdhan India) मालिकेसंदर्भात बातमी समोर आली आहे. स्टार इंडियाची मालिका सावधान इंडियाच्या दोन क्रू मेंबर्सचा रस्तावर अपघात झाला. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यापैकी एकाची ओळख सहायक आर्ट डायरेक्टर प्रमोद अशी आहे, तर दुसरा सेटवर हेल्पर म्हणून काम करत होता. घरी जात असताना या दोघांचा अपघात झाला.

हा अपघात कसा घडला याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. रिपोर्टनुसार सावधान इंडिया मालिकेचे काम संपवून प्रमोद घरी जात होते. त्यांच्यासोबत आणखी एक क्रू मेंबरदेखील होता. हा अपघात शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास झाला आहे. अपघातानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र ते वाचू शकले नाहीत.

आर्ट डायरेक्टर्स असोसिएशनचे माजी सरचिटणीस दिलीप यांनी घटनेची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, “आम्ही प्रमोदला गमावले यावर विश्वासच बसत नाही. हे फार वाईट आहे. शुक्रवारी सकाळी सात वाजता शूट सुरू होऊन दुसर्‍या दिवशी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालले. सकाळपर्यंत प्रमोद शूटवरच होता. २० तास सतत काम करणे ही मोठी गोष्ट आहे. कोणत्याही मानसाला इतक्या वेळ शिफ्ट केल्यावर थकवा तर येणारच. मुळात २० तास शिफ्ट लावणेच चूकीचे आहे.” ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’चे अध्यक्ष बी.एन तिवारी यांनी सांगितले की, या चॅनेलला पत्र पाठवून त्यांच्याकडून २० तासांच्या शिफ्टबद्दल माहिती घेण्यात येईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER