आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण ; गुप्तचर अहवालाने ठाकरे सरकारला मोठा दिलासा

Mahavikas Aghadi

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पोषक वातावरण असल्याचा महत्त्वपूर्ण अहवाल राज्याच्या गुप्तचर विभाग यंत्रणेने तयार केला आहे . गुप्तचर खात्याने ठाकरे सरकारकडे (Thackeray Government) अहवाल सुपूर्द केल्याची माहिती आहे.

विधानपरिषद‌ निवडणुकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) चांगलं यश मिळालं होतं. त्यानंतर आगामी महापालिका निवडणुकांमध्येही महाविकास आघाडीने कंबर कसली आहे .

मुंबई महापालिकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी (NCP)-शिवसेना (Shiv Sena) एकत्रित ताकदीने सामोरे जाणार असल्याचं सांगितलं होतं. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही याचा पुनरुच्चार केला. मात्र काँग्रेकडून मुंबई महापालिकेबाबत अद्याप स्पष्टोक्ती नाही.

दरम्यान राज्यातील पाच महापालिका आणि तब्बल 96 नगरपालिकांची निवडणूक फेब्रुवारी महिन्यात लागण्याची चिन्हं आहेत. या पालिका-नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे. यामध्ये नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांचाही समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER