मामा-भाच्याच्या म्रुत्यु प्रकरणी शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

नागपूर : हिंगणा तालुक्यातील खडकी येथील मामा-भाच्याचा म्रुत्यु शेतातील कुंपनाच्या तारेतील वीज प्रवाहामुळे करंट लागून झाल्याचे निष्पन्न झाले असून, वीज प्रवाह सोडणाऱ्या शेतकऱ्या विरुद्ध अखेर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शंकर निहारे, रा.खडकी,असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
उमेश दयाराम मरसकोल्हे (वय ३०) व सागर विनोद आत्राम (वय १५, दोन्ही रा. खडकी, कान्होलीबारा) हे दोघे मामा -भाचे

२६ नोव्हेंबरला रात्री खडकी गावालगतच्या नाल्यावर खेकडे पकडण्यासाठी गेले होते. रात्र झाल्यानंतरही ते घरी परतले नाही. नातेवाइकांनी शोध घेतला असता आढळले नाही.नातेवाइकांनी हिंगणा पोलिसांत तक्रार दिली.पोलिसांनी दोघे बेपत्ता असल्याची नोंद केली. बुधवारी सायंकाळी शेताजवळ दोघांचेही मृतदेह आढळले. शेतातील कुंपनाच्या तारांना स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान रवींद्र निहारे यांनी शेतातील कुंपनात विजेचा प्रवाह सोडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.याशिवाय गुन्हा लपविण्यासाठी दोन्ही शव दुसऱ्या जागी नेउन टाकण्यात आल्याचेही निष्पन्न झाले आहे.

विनायक पुंड