विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी पडळकरांवर गुन्हा दाखल

A case has been registered against Padalkar for participating

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना एमपीएसी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतल्याप्रकरणी तसंच गर्दी केल्याप्रकरणी पुण्यात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस ठाण्यात कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी संतप्त झाले होते. गुरुवारी पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या सहभागामुळे आंदोलनाला आणखीनच धार आली होती. तसंच त्यांनी आक्रमक भूमिका थेट राज्य सरकारवर सडकून प्रहार केले. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गर्दी न जमवण्याचं आवाहन पोलिस आणि प्रशासन करत आहेत. अशा परिस्थितीत गुरुवारी नवी पेठ भागात हजारो विद्यार्थ्यांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. याच पार्श्वभूमीवर कलम १८८ नुसार पडळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER