मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार आढळल्याने खळबळ

Mukesh Ambani

मुंबई :- भारतातील प्रमुख उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाजवळ आढळलेल्या या कारमध्ये जिलेटिनचा साठा आहे, असे कळते. पोलीस आणि श्वानपथकं आणि स्फोटके तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहचले आहे. या स्फोटकांसोबत धमकीची चिठ्ठीही सापडली आहे, असे कळते.

अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू : शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)

वाहन ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा तपास करते आहे. मुकेश अंबानी यांनी घाबरण्याचे कारण नाही. गरज पडली तर अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवू, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांनी दिली. याबाबतचे सविस्तर वृत्त अजून मिळालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER