राज ठाकरेंचा एक कॉल अन्, ‘त्या’ वृद्ध शिक्षिकेला काही तासांतच मदतीचा ओघ सुरू

Suman Randive - Avinash Jadhav - Raj Thackeray

ठाणे : नुकताच येऊन गेलेल्या तौत्के चक्रीवादळचा सर्वात मोठा फटका पश्चिम किनारपट्टीला बसला. यात समुद्र किनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वसई येथील एका वृद्धाश्रमाचेही या वादळामुळे मोठे नुकसान झाले. याच वृद्धाश्रमात राहत असलेल्या सुमन लक्ष्मीकांत रणदिवे (Suman Randive) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि जल संपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना मदतीसाठी साद घातली होती. रणदिवे या दादर येथील बालमोहन विद्या मंदिरात शिक्षिका होत्या. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे त्यांचे विद्यार्थी आहेत.

दरम्यान, आज सकाळी राज ठाकरेंनी सुमन रणदिवेंशी फोनवरून संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शक्य तेवढी मदत वृद्धाश्रमाला केली जाईल, असं आश्वासन राज यांनी रणदिवे यांना दिलं होतं. त्यानंतर काही तासांत त्यांच्यापर्यंत मदत पोहचवण्यात आली. राज ठाकरेंचे पुत्र अमित यांनीही रणदिवे यांच्याशी संवाद साधला. अमित यांनी रणदिवे यांच्याशी फोनवरून संवादही साधला. यापुढेदेखील वृद्धाश्रमाला सर्वोत्तोपरी मदत करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला. राज ठाकरेंनी सुमन रणदिवे यांना मदतीचं आश्वासन दिल्यानंतर अमित ठाकरेंनी परिसरातील मनसेच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांना सूचना केल्या. त्यानंतर थोड्याच वेळात वृद्धाश्रम परिसरात मदत पोहोचली.

वृद्धाश्रमातील २९ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवून दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती मनसेचे ठाणे- पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी सांगितलं. ज्यांनी आमच्या राज साहेबांना शिकवलं, त्यांचे आशीर्वाद आमच्यासाठी लाख मोलाचे आहेत, असे म्हणत जाधव यांनी रणदिवे यांचे आशीर्वादही घेतले. तसेच राज ठाकरे यांच्या शिक्षिका असल्याने इतर संस्थांकडूनही मदतीचा ओघ सुरू झाला. रणदिवे ज्या शाळेत शिक्षिका होत्या त्या बालमोहन विद्या मंदिर शाळेने वृद्धाश्रमाला अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button