मुंबईतील मालाड परिसरातील इमारत कोसळली, ११ जणांचा मृत्यू तर ८ जण जखमी

Maharashtra Today

मुंबई : बुधवारपासून मुंबईत सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मालाडमधील (Malad)एका ३ मजली चाळीचा काही भाग कोसळल्याची (Building Colaapse)दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ६ मुलांसह ९ जणांचा करुण अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बचावकार्यासाठी दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या ठिकाणी एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहे. या चाळीत राहणाऱ्या राफिक यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. राफिक यांच्यासह त्यांची पत्नी रईसा बानो आणि घरातील ६ चिमुरडे ढिगाराखाली सापडले. तर राफिक यांचा भाऊ आणि त्याची पत्नीसुद्धा ढिगाराखाली अडकले आणि त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील एकूण ९ जणांचा या दुर्घटनेमध्ये करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिकेसह इतर प्रशासन घटनास्थळी दाखल आहे. या दुर्घटनेत अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १७ जणांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढलं आहे. मात्र अद्याप अजून या ठिकाणी बचावकार्य सुरु आहे. मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्थानिकांच्या मते, ही संपूर्ण दुर्घटना रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यात सुरुवातीला एक दुमजली घर कोसळले. यानंतर एकापाठोपाठ एक अशी तीन घर कोसळली. यातील एका घरात ७ जण राहत होते. त्यातील ५ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. या इमारतीच्या अगदी विरुद्ध दिशेला आणखी दोन इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. यामुळे दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button