सोन्याचा दरात मोठी घसरण

Gold prices fall by two thousand

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Bazaar) मंदी आणि सोनाच्या (Gold) दरात घसरण सुरुच आहे. सलग चौथ्या दिवशी सोन्याचा दरात घसरण झाली. काल गुरुवारी सोन्याच्या दरात ४८५ रुपयांची घसरण झाली. यामुळे सोन्याचा प्रतितोळा (प्रति १० ग्रॅम) दर ५०,४१८ रुपयांपर्यंत खाली आला. बुधवारी सोन्याचा दर ५०,९०३ रुपये होता. त्यात रोज घसरण होत आहे. वायदे बाजारात गुरुवारी सोने ०.१६ टक्क्यांनी घसरुन प्रतितोळा ४९,४२८ रुपये झाले होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये ऑक्टोबर डिलिवरी सोन्याचा दर ८० रुपयांनी घसरून ४९,४२८ वर स्थिर झाला होता.

पुढील काही दिवसांत सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोरोना संकटामुळे निर्माण झालेली आर्थिक मंदी, रुपयाच्या तुलनेत कमजोर झालेला डॉलर आणि मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER