सोने दरात मोठी घसरण

Gold Prices

नवी दिल्ली : सोन्याच्या दरात (Gold prices) आज जबरदस्त घसरण झालेली पाहायला मिळाली. सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत ९ हजारांची घसरण झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घसरण आहे. सोमवारच्या बाजारभावानुसार, मुंबईत २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ४७,१५० रुपये इतका आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा ४६,१५० रुपये इतका आहे. तर, नवी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा ५०,४२० रुपये इतका झाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचा दर ५६ हजारांवर गेला होता. त्यात आता मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव ०.१३ टक्क्यांनी घसरला आहे. ही ६ सत्रातील पाचवी घसरण असल्याची माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाहीतर चांदीच्या किंमतीतही ०.२ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांसाठी शुभवर्तमान आहे. दरम्यान, अर्थसंकल्पामध्ये कस्टम ड्युडी कमी झाली असली तरीही अर्थमंत्र्यांनी सोन्यावर, चांदीवर २.५ टक्के अधिभार लावणार असल्याची माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER