वीजग्राहकाला महावितरणने दिला देयकाचा जोरदार झटका

एका महिन्याचे धाडले साडेआठ लाखांचे देयक

ठाणे :  दोन ट्यूब,फ्रीज,टीव्ही आणि पंखा अशी विजेवर चालणारी मर्यादित घरगुती उपकरणे वापरणा-या एका वीजग्राहकाला महावित्तरणने एका महिन्याचे तब्ब्ल आठ लाख 55 हजार 220 रुपायांचे देयक पाठवून जोरदार झटका दिला आहे.एवढ्या मोठ्या रक्कमेचे आवाजावी देयक बघून स्थानिक नागरीक आश्चर्य व्यक्त करत आहेत.

मुंब्रा बाजारपेठेतील अरिहंत अपार्टमेंन्ट या इमारतीच्या तीस-या मजल्यावर रहात असलेल्या विजया चव्हाण याना मागील अनेक वर्षापासून महावित्तरण प्रत्येक महिन्यात वापरत असलेल्या युनिट प्रमाणे त्याना धाडत असलेल्या देयकाची रक्कम त्या नियमितपणे भरत आहेत.परंतु नोंव्हेंबर 2019 ते जानेवारी 2020 दरम्याच्या तीन महिन्यात त्याना सरासरी 79 युनिट वापरल्याचे देयक धाडण्यत आले.

त्यानंतरच्या फेब्रुवारी महिन्याच्या देयकात मात्र त्यानी चक्क 48 हजार 797 युनिट वापर केल्याचे नमूद करुन त्यापोटी आठ लाख 55 हजार 220 रुपये एवढी रक्कम भरण्याचे देयक पाठवले आहे.एवढ्या मोठ्या रक्कमेचे देयक बघून चव्हाण काव-या बाव-या झाल्या असून,देयक हातात पडल्यापासून त्या मानसिक तणावाखाली वावरत आहे.याबाबत नेमकी दाद कोणाकडे मागायची,तक्रार कुणाकडे करायची याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे सध्या देयक घेऊन चलबिचल अवस्थेत वावरत असलेल्या चव्हाण याची कैफियत लोकमतच्या प्रतिनिधिने महावित्तरणचे कार्यकारी अभियंता (शिळ विभाग) पाडुरंग हुंडेकरी यांच्याकडे मांडली असता,त्यांनी संबधित वीज ग्राहकाला मेक औद्योगिक वती मध्ये असलेल्या महावित्तरणच्या कार्यालयतील अधिका-यांशी सोमवारी स़पर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.