अजितदादांचा राजू शेट्टींना मोठा धक्का, स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादीत

Maharashtra Today

पंढरपूर :- पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या ऐन तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत (Swabhimani Shetkari Sanghatana)मोठे खिंडार पाडले. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील (Sachin Patil) यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज काल पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीररीत्या प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याचे जाहीर करत त्यांचे स्वागत केले.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराने वेग धरला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र स्वतंत्रपणे उमेदवार उतरवला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी ही पंढरपूरची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हे दोन्ही नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन पाटील यांना विजयी करण्यासाठी पंढरपुरात मुक्कामाला आहेत. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने स्वाभिमानीला पंढरपुरात जबर धक्का बसला आहे.

गादेगाव येथे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माजी जिल्हा अध्यक्ष समाधान फाटे, नवनाथ माने, कीर्तीकुमार गायकवाड, अतुल कारंडे, चंद्रकांत बागल, अमोल पवार, अतुल फाटे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम केलं. परंतु शेतकऱ्यांचा कुठलाही प्रश्न सोडवता आला नाही. उलट चळवळीच्या नावाखाली अनेकांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतल्याचा आरोप समाधान फाटे यांनी केला.

ही बातमी पण वाचा : अखेर कल्याण काळे राष्ट्रवादीत, अजितदादा म्हणाले…भालकेंच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्ण ताकद लावू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button