
रत्नागिरी : दापोली तालुक्यातील दाभोळ समुद्रकिनारी सुरुच्या बनात कोणत्यातरी प्राण्याच्या मांसाचे तुकडे पिशवीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडे व इतरत्र चौकशी केल्यानंतर अखेर कोणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने अखेर रात्री उशिरा तक्रार देण्यात आली. याबाबत दत्ताराम रामचंद्र वानरकर (४०, रा. कुंभारवाडा दाभोळ, दापोली) यांनी दाभोळ पोलिसांकडे तक्रार दिली आहे. दाभोळ समुद्रकिनारी अज्ञाताने कोणत्यातरी प्राण्यास ठार मारुन त्याच्या मांसाचे तुकडे करुन ते प्लास्टिक व सिमेंटच्या पिवशीमध्ये भरुन ठेवले होते. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टेमकर करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला